Sanjivani Jadhav
Sanjivani Jadhav

आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत संजीवनी जाधवला सुवर्ण

गुंटूर : भविष्यात लांब पल्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्या संजीवनी जाधवने महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. 

आचार्य नागार्जूना विद्यापीठाच्या यजमानात्वाखाली ही स्पर्धा सुरू आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या संजीवनीचे हे पाच हजार मीटर शर्यतीतील हे सलग चौथे सुवर्णपदक आहे. आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या संजीवनीने प्रतिस्पर्ध्याना संधी न देता 15 मिनिटे 51.58 सेकंदात शर्यत जिंकली. अल फलाह विद्यापीठाच्या वर्षा देवीला 16 मिनीटे 50.23 सेकंदात रौप्य तर दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ च्या डिम्पल सिंगला 16 मिनीटे 56.88 सेकंदात ब्राँझ पदक जिंकले. 

पुरूषांच्या शर्यतीत पंजाबच्या रणजीत कुमारने किसन तडवीला मागे टाकून 14 मिनिटे 39.19 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. किसनला 14 मिनिटे 39.56 सेकंदात रौप्य मिळाले. गतवर्षी किसनने सुवर्णपदक जिंकले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com