मुंबईकर सौरव बंदोपाध्याय निर्विवाद वर्चस्वासह प्रथम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

श्रीपेरंबुदूर - मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिली शर्यत जिंकली. पोल पोझिशन ते चेकर्ड फ्लॅग अर्थात पात्रता फेरीतील अव्वल क्रमांकानंतर त्याने शर्यत जिंकत निर्विवाद वर्चस्व राखले. कारकिर्दीत त्याने या स्पर्धेत प्रथमच विजय मिळविला. विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेला करमिंदर सिंग दुसरा, तर त्याचा प्रतिस्पर्धी संदीप कुमार तिसरा आला.

शुक्रवारी मुसळधार पावसामुळे मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे सर्किटवरील फेरीचे अंतर कमी करण्यात आले. त्यामुळे स्पर्धकांना बदलत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. यात जुळवून घेण्यात बंदोपाध्याय सरस ठरला. त्याने पात्रता फेरीत सर्वोत्तम वेळ नोंदविली. मग शर्यतीला सुरवात केल्यानंतर त्याने पहिल्या वळणावर सफाईने वेग राखला. त्यामुळे करमिंदर त्याला मागे टाकू शकला नाही. दुसरीकडे संदीपने करमिंदरसमोर आव्हान निर्माण केले. या दोघांतच खरी चुरस झाली, पण दहाव्या फेरीला संदीपचा वेग कमी झाला. कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने चौथा, गोव्याच्या डोनोवान वाझने पाचवा, तर मुंबईच्या आदित्य पवारने आठवा क्रमांक मिळविला.

बंदोपाध्यायने १२ फेऱ्यांच्या शर्यतीसाठी १६ मिनिटे ५.८५८ सेकंद वेळ नोंदविली. करमिंदर (१६ः१३.२०४) दुसरा, तर संदीप (१६ः१४.२०४) तिसरा आला.