साताऱ्याची स्नेहल भारतीय तिरंदाजी संघात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - साताऱ्याच्या स्नेहल मांढरेने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंडच्या वरिष्ठ संघातील स्थान कायम राखताना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना पराजित केले. बर्लिन येथील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी हा संघ जाहीर झाला आहे. 

कम्पाऊंड संघाची निवड चाचणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सोनीपत येथील केंद्रात झाली. त्यातील चाचणीत स्नेहलने दुसऱ्या क्रमांकाने स्थान मिळविले. सातारा जिल्ह्यातील पाचवडची असलेल्या स्नेहल विष्णू मांढरेने गतवर्षी विश्‍वकरंडक स्पर्धेत पदक जिंकलेली प्रभज्योत कौर, आशियाई स्पर्धा पदक विजेती त्रिशा देव, नुकत्याच आशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकलेली खूषबू दयाल, जयलक्ष्मी सारीकोंडा तसेच दिव्या दयाल यांना हरवण्याचा पराक्रम केला होता. स्नेहल यंदाच्या तिसऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात आली आहे. पहिल्या दोन स्पर्धात सांघिक ब्राँझ थोडक्‍यात हुकले होते, यावेळी ते मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या स्पर्धेतील अनुभवाचा मला जागतिक विद्यापीठ स्पर्धेतही फायदा होईल, असे तिने सांगितले.