ओटिस गिब्सन दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक

पीटीआय
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

डर्बन - दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ओटिस गिब्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज गिब्सन सध्या विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने गिब्सन यांना करार अर्धवट सोडण्यास परवानगी दिली आहे. गिब्सन यापूर्वी २०१९० ते २०१४ कालावधीत विंडीजचे प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडीजने २०१२ मध्ये टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. गेली चार वर्षे रसेल डोमिंगो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक होते.

डर्बन - दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ओटिस गिब्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज गिब्सन सध्या विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने गिब्सन यांना करार अर्धवट सोडण्यास परवानगी दिली आहे. गिब्सन यापूर्वी २०१९० ते २०१४ कालावधीत विंडीजचे प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडीजने २०१२ मध्ये टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. गेली चार वर्षे रसेल डोमिंगो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक होते. मात्र, त्यांनी आपला करार वाढविण्यास नकार दिल्यामुळे दक्षिण आफ्रिका नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होते.