पुणेरी पलटणला जपानी भिक्‍खूचे कवच

मुकुंद पोतदार
रविवार, 25 जून 2017

पुणे - प्रो कबड्डी लीगच्या नव्या मोसमासाठी पुणेरी पलटण सज्ज होत असून, या संघाला ताकामित्सू कोनो या जपानी भिक्‍खूचे कवच लाभले आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील अनुभव आणि गेल्या मोसमात अल्प संधीत ठसा उमटविल्यानंतर तो आता ॲक्‍शनमध्ये येण्यासाठी सज्ज होत आहे.

सैतामा येथील गार्यो मोनॅस्ट्रीमध्ये तो भिक्‍खू आहे. वडील आणि आजोबांप्रमाणेच तो भिक्‍खू बनला. कबड्डीपटू कसे बनलास, या प्रश्नावर त्याने एक किस्साच सांगितला. तो म्हणाला की, मी तैशो विद्यापीठातून बौद्ध तत्त्वज्ञान या विषयात पदवी संपादन केली. याच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कबड्डीची माहिती आहे. ती वाचून मला कुतूहल वाटले.

त्याच संकेतस्थळावर एक व्हिडिओसुद्धा अपलोड करण्यात आला होता. तो पाहून मला या खेळाने मोहीत केले. त्याच विद्यापीठाचे खेळाडू कबड्डीचा सराव करीत होते असेही कळले. कैजून इटो यांच्याकडून मी कबड्डीचे धडे गिरविले. गेली पाच वर्षे मी कबड्डीचा सराव करतो आहे.

कोनो आधी रग्बी आणि टेनिस खेळायचा. तो शालेय पातळीवर रग्बी खेळला होता. आता मात्र कबड्डी हाच त्याचा एकमेव ध्यास आहे. कबड्डी आणि रग्बीची तुलना करताना तो म्हणाला की, रग्बीत ताकद आणि वेगाला महत्त्व असते, कबड्डीत याशिवाय चापल्यही लागते. त्यात टायमिंग महत्त्वाचे असते. हा खेळ डोक्‍याने खेळावा लागतो.

कबड्डी का भावली, या प्रश्नावर त्याने सांगितले की, हा खेळ संघभावनेला चालना देणारा आहे. त्यात वैयक्तिक चमकही दाखविता येते.

गेल्या मोसमात तो दिल्ली दबंगकडून खेळला. शेवटच्या सामन्यात त्याला दोनच मिनिटे संधी मिळाली, पण त्यातही चढाईत एक आणि पकडीत एक गुण अशी कामगिरी नोंदवीत त्याने गुणवत्तेची चुणूक दाखविली.

कोनोवर नामवंत भारतीय प्रशिक्षक अशोक शिंदे यांचा प्रभाव आहे. गेल्या वर्षी अशोक शिंदे आले होते त्यांनी जपानच्या संघाला विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले होते. त्यातून खूप काही शिकता आले असे कोनो आवर्जून नमूद करतो. भारतीय कबड्डीपटूंच्या कौशल्याचे त्याला अप्रूप वाटते, ते आत्मसात करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे. पुणेरी पलटणमध्ये बरेच चांगले खेळाडू आहेत. गिरीश, संदीप नरवाल, त्यांच्या साथीत त्याला अनुभव मिळवायचा आहे..

गेल्या वर्षी जपानच्या संघाची पदक जिंकण्याची जिद्द होती, पण त्यांना अपयश आले. कोनोला याची खंत वाटते. थायलंडचा खोमसान थोंगकाम आणि इराणचा फझेल अत्राचाली हे त्याचे आवडते खेळाडू आहेत.