निवृत्तीची घटिका समीप

संकलन - नरेश शेळके
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

शंभर मीटर शर्यतीतील बेताज बादशहा जमैकाचा उसेन बोल्ट जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेनंतर स्पर्धात्मक ॲथलेटिक्‍समधून निवृत्त होत आहे. पाच वर्षांपूर्वी पाच ऑगस्टलाच बोल्टने लंडनच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये ऑलिंपिक शंभर मीटर शर्यत जिंकली होती. पुन्हा याच स्टेडियममध्ये वेगवान धावपटूचा किताब मिळवून कारकिर्दीचा सुखद शेवट करण्यास बोल्ट सज्ज आहे. बोल्ट या शर्यतीनंतर निवृत्त होईल. तेव्हा प्रतिस्पर्धी धावक सुटकेचा निश्‍वास टाकतील. पण, पुन्हा दुसरा बोल्ट उदयास येईपर्यंत शंभर मीटर शर्यतीचे वलय हरवलेले असेल यात शंका नाही.

शंभर मीटर शर्यतीतील बेताज बादशहा जमैकाचा उसेन बोल्ट जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेनंतर स्पर्धात्मक ॲथलेटिक्‍समधून निवृत्त होत आहे. पाच वर्षांपूर्वी पाच ऑगस्टलाच बोल्टने लंडनच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये ऑलिंपिक शंभर मीटर शर्यत जिंकली होती. पुन्हा याच स्टेडियममध्ये वेगवान धावपटूचा किताब मिळवून कारकिर्दीचा सुखद शेवट करण्यास बोल्ट सज्ज आहे. बोल्ट या शर्यतीनंतर निवृत्त होईल. तेव्हा प्रतिस्पर्धी धावक सुटकेचा निश्‍वास टाकतील. पण, पुन्हा दुसरा बोल्ट उदयास येईपर्यंत शंभर मीटर शर्यतीचे वलय हरवलेले असेल यात शंका नाही. बोल्ट रिले शर्यतीतही धावणार असल्याने १२ ऑगस्ट रोजी होणारी ४ बाय १०० मीटर रिले शर्यत त्याच्या कारकिर्दीतील अखेरची शर्यत असेल. नेहमीप्रमाणे यावेळेही बोल्टला जमैकन सहकारी आणि अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान आहे. सहभागी होणाऱ्या एकूण ६६ स्पर्धकांपैकी अकरा धावपटूंनी यंदा दहा सेकंदाच्या आत वेळ नोंदवली असून त्यात बोल्ट (९.९५ सेकंद) अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीन सोबत संयुक्तपणे पाचवा आहे. 

प्रमुख प्रतिस्पर्धी (मोसमातील सर्वोत्तम कामगिरीनुसार) 
ख्रिस्तीयन कोलमन (अमेरिका)     ९.८२ सेकंद 
योहान ब्लेक (जमैका)     ९.९० सेकंद 
अकानी सिम्बिने (द. आफ्रिका)     ९.९२ सेकंद 
ख्रिस्तोफर बेलचर (अमेरिका)     ९.९३ सेकंद 
जस्टिन गॅटलीन (अमेरिका)     ९.९५ सेकंद 
थांडो रोटो (दक्षिण आफ्रिका)     ९.९५ सेकंद 
आंद्रे दी ग्रासी (कॅनडा)     १०.०१ सेकंद

शंभर मीटरचा कार्यक्रम
४ ऑगस्ट - पात्रता फेरी - रात्री ११.३० 
- प्राथमिक फेरी (हिट) पहाटे १२.५० (५ ऑगस्ट) 
५ ऑगस्ट - उपांत्य फेरी - रात्री ११.३५ 
- अंतिम फेरी - पहाटे २.१५ (६ ऑगस्ट) 
(सर्व वेळा - भारतीय वेळेनुसार)