असले कसले कसोटी मालिकांचे नियोजन

असले कसले कसोटी मालिकांचे नियोजन

नागपूर - सततच्या क्रिकेट खेळण्यामुळे त्रस्त झालेल्या कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच (बीसीसीआय) धारेवर धरले. असले कसले कसोटी मालिकांचे नियोजन, की ज्यात विश्रांतीला संधीच नाही, असे म्हणत त्याने ‘बीसीसीआय’च्या नियोजनावर टीका केली.

भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर तीन वन-डे आणि तेवढेच टी २० सामने होणार आहेत. हा दौरा संपताच दोन दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. हाच धागा पकडून कोहलीने ‘बीसीसीआय’वर टीका केली. तो म्हणाला,‘‘दुसरी मालिका सुरू होण्यापूर्वी तयारीसाठी किमान एका महिन्याचा तरी कालावधी असायला हवा; पण इथे आम्हाला ठरवलेल्या कार्यक्रमानुसारच तयारी करावी लागत आहे. पर्यायाने या सगळ्याचा क्रिकेटपटूंच्या कार्यक्रमावर परिणाम होत आहे.’’

श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरू असतानाही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याविषयी प्रश्‍नाचा मारा सुरू झाल्यावर कोहलीने आपली मते स्पष्टपणे मांडली. कोहली म्हणाला, ‘‘या मालिकेनंतर आम्ही दोन दिवसांत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहोत. तयारीसाठी आमच्याकडे पर्यायच नाही. त्यामुळे आम्ही श्रीलंकेविरुद्धच्याच मालिकेकडे तयारी म्हणून बघत आहोत. खरे, तर इतक्‍या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी एका महिन्याची विश्रांती हवी होती. आमच्या क्षमतेप्रमाणे आम्ही स्वत-ला तयार करत आहोत. त्यापेक्षा तयार व्हावे लागते असे म्हणणे बरोबर ठरेल.’’ कोहलीने सातत्याने खेळाडूंच्या विश्रांतीचा उल्लेख केला. तो म्हणाला, ‘‘आमचा कार्यक्रम कमालीचा व्यग्र आहे. यातूनही आम्हाला वेळ मिळायला हवा. अन्य देश दुसऱ्या देशाचा दौरा करतात तेव्हा ते सरावासाठी किती वेळ घेतात हे पाहा. आम्हाला तेवढाही वेळ मिळत नाही. आम्ही सतत खेळतच आहोत.’’

एका वर्षात ५३ आंतरराष्ट्रीय लढती
वि. इंग्लंड - ३ वन-डे, ३ ट्‌वेंटी २०,  वि. बांगलादेश - एक कसोटी, वि. ऑस्ट्रेलिया - ४ कसोटी,  चॅंपियन्स स्पर्धा - ५ वन डे,  विंडीजमध्ये - ५ वन-डे, एक ट्‌वेंटी २०,  श्रीलंकेत - ३ कसोटी, ५ वन-डे आणि १ ट्‌वेंटी २०,  वि. ऑस्ट्रेलिया - ५ वन-डे आणि २ ट्‌वेंटी २०,  वि. न्यूझीलंड - ३ वन-डे आणि ३ ट्‌वेंटी २०,  वि. श्रीलंका* - ३ कसोटी, ३ वन-डे आणि ३ ट्‌वेंटी २०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com