सात महिला बॉक्‍सरची उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

हो ची मिन्ह सिटी - भारतीय महिला बॉक्‍सरनी आशियाई स्पर्धेतील विजयी मालिका कायम ठेवली आहे. सरितादेवी, सोनिया लाथेर, लोवेलिना बॉर्गहेन यांनी उपांत्य फेरीत धडक मारल्यामुळे भारताच्या दहापैकी सात बॉक्‍सरचे पदक निश्‍चित झाले आहे. 

माजी जागतिक विजेत्या सरिताने ६४ किलो गटात उझबेकिस्तानच्या माफ्तुनाखॉन मेलिएवा हिला ५-० असे सहज हरवले. मेरी कोमनेही यापूर्वीच ही कामगिरी केली आहे. मणिपूरच्या सरिताने प्रतिस्पर्धीस कोणतीही संधी दिली नाही. तिने वेगवान हल्ला करीत प्रतिस्पर्ध्यावरील दडपण वाढवले. तिच्या उजव्या ठोशाला प्रतिस्पर्धी उत्तरच देऊ शकली नाही. 

मेरीप्रमाणेच (४८ किलो), प्रियांका चौधरी (६० किलो), सीमा पुनिया (८१ किलोपेक्षा अधिक) आणि साक्षी (५४ किलो) यांनी यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे. जागतिक रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेर हिने नझीम इचशानोवा हिचा ३-२ असा पराभव केला.

Web Title: sports news women boxing competition