वर्ल्ड कप फुटबॉलचा ड्रॉ सिंधूच्या उपस्थितीत

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - भारतात ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ एस्टेबान कॅम्बिआसो तसेच नवांक्वो कानू यांच्या उपस्थितीत काढण्यात येईल. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमास ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूही उपस्थित असणार आहे.

कॅम्बिआसो तसेच कानू यांनी काही वर्षांपूर्वी सतरा वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा गाजवली होती. सुपर इगल्स संबोधल्या जाणाऱ्या नायजेरियाने ही स्पर्धा १९९३ मध्ये जिंकली होती. त्या संघात कानू यांचा समावेश होता, तर कॅम्बिआसो हे १९९५ च्या स्पर्धेत अर्जेंटिनाकडून खेळले होते. कानू यांनी १९९६ मध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले होते, तसेच त्यांची दोनदा आफ्रिकन खेळाडू म्हणून निवड झाली होती. ते १९९८, २००२ आणि २०१०च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळले होते. कॅम्बिआसो १९९७ च्या विश्वकरंडक २० वर्षाखालील स्पर्धेतही खेळले आहेत. 

या दोघांबरोबर भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री तसेच पी. व्ही. सिंधू यांचाही सहभाग असेल. ते कॅम्बिआसो आणि कानू यांचे सहायक असतील.