वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्‍स स्पर्धेत अमितला रौप्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

लंडन - जागतिक पॅरा ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सोमवारी भारताच्या अमित कुमार सरोहा याने पुरुषांच्या क्‍लब थ्रो प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.

लंडन - जागतिक पॅरा ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सोमवारी भारताच्या अमित कुमार सरोहा याने पुरुषांच्या क्‍लब थ्रो प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.

सरोहाने तिसऱ्या प्रयत्नांत ३०.२५ मीटर फेक करून ही कामगिरी केली. त्याची कामगिरी ही आशियाई विक्रम ठरली. सर्बियाच्या झेल्जतो दिमित्रीजेविच याने ३१.९९ मीटर फेक करून सुवर्णपदक राखले. याच प्रकारात भारताचाच धरमवीर २२.३४ मीटरसह दहाव्या क्रमांकावर राहिला. सरोहाने २०१५ मध्ये बीएनिअल अजिंक्‍यपद स्पर्धेत याच प्रकारात रौप्य, तर इंचेऑन येथे २०१४ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. सरोहा आता उद्या थाळी फेकीच्या एफ ५२ प्रकाराच्या अंतिम 
फेरीत आपले कौशल्य अजमावणार आहे.

टॅग्स