विदित आणि सेतुरामनची झुंजार वाटचाल संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

टिब्लीसी (जॉर्जिया) - विदित गुजराथी आणि एस. पी. सेतुरामन यांची विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील झुंजार वाटचाल तिसऱ्या फेरीत खंडित झाली. 
विदीत (२७०२) व चीनचा डींग लिरेन (२७७१) यांच्यात दोन पारंपरिक डावांत गुणांची बरोबरी झाली. त्यामुळे जलद पद्धतीचे टायब्रेक डाव झाले. त्यात २५ मिनिटांचा निर्धारित वेळ व त्यात चालीगणिक दहा सेकंदांची भर असे स्वरूप होते. पहिला टायब्रेक डाव ४७ चालींत बरोबरीत सुटला. मात्र लिरेनने दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांसह ३८ चालींत विजय मिळवीत चौथ्या फेरीतील प्रवेश नक्की केला.

अनिश गिरीसारख्या (२७७७) कसलेल्या तसेच मातब्बर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सेतुरामनने (२६१७) आपल्या जिगरबाज तसेच लढाऊ वृत्तीचे प्रदर्शन कायम ठेवले. पहिला टायब्रेक डाव गिरीने ६६ चालींत जिंकला. मात्र परतीच्या डावात सेतुने पांढऱ्या मोहऱ्यांसह ३४ चालींत गिरीच्या राजाला यशस्वी शह दिला. १-१ अशा बरोबरीमुळे अतिजलद स्वरूपाचा टायब्रेक झाला. त्यात दहा मिनिटांची निर्धारित वेळ व चालीगणिक दहा सेकंदांची भर असे स्वरूप होते. पहिल्या डावात गिरीने पांढऱ्या मोहऱ्यांसह विजय मिळवीत आघाडी घेतली. यामुळे सेतूला दुसऱ्या डावात विजय अनिवार्य होता, पण २५व्या चालीस गिरीने अश्‍वाची ‘जी ४’ ही सुंदर चाल करून पकड घेतली. पुढील चालीपासून सेतुची पटस्थिती कमकुवत होऊ लागली. त्याने अटोकाट प्रयत्न केला, पण ५३व्या चालीअखेर त्याला पराभव मान्य करावा लागला.

Web Title: sports news worldcup chess competition