उद्याच्या सामन्यात खेळ उंचावू - धीरज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - प्रथम विश्वकरंडक स्पर्धा खेळत असल्यामुळे आमच्यावर दडपण होते; तरीही अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असतो. या पराभवातून शिकता आले, याचा उपयोग करून आम्ही सोमवारच्या साखळी सामन्यात चांगला खेळ करू, असा विश्वास भारतीय गोलरक्षक धीरज मॉरिंगदेमने व्यक्त केला. हा खडतर सामना होता. भरलेल्या स्डेडियममध्येही प्रथमच खेळण्याचा अनुभव होता; तरीही पराभव निश्‍चितच निराशाजनक होता. आम्हाला यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करता आली असती; परंतु त्या सामन्यातून खूप काही शिकता आले. याचा उपयोग करून आम्ही सोमवारच्या सामन्यात सुधारणा करू, असे मत गोलरक्षक धीरजने व्यक्त केले.

Web Title: sports news worldcup competition