मुंबईत नोव्हेंबरमध्ये रंगणार डब्ल्यूटीए स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - भारतात पाच वर्षांनंतर होत असलेल्या डब्ल्यूटीए स्पर्धेचे आयोजन करण्याचा बहुमान मुंबईने मिळविला आहे. ही स्पर्धा सीसीआयवर २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान होईल. याच सीसीआयवर दशकापूर्वी भारत-पाकिस्तान डेव्हिस करंडक स्पर्धेची लढत झाली होती.

डब्ल्यूटीएने नोव्हेंबरचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात मुंबईच्या या स्पर्धेबरोबरच  होनोलुलु (अमेरिका) येथेही एक लाख २५ हजार डॉलर मालिकेतील स्पर्धा होईल, असे सांगितले आहे. या स्पर्धेत एकंदर १ लाख १५ हजार  डॉलरचे बक्षीस असेल. या स्पर्धेत विजेतीला २० हजार मिळतील. त्याचबरोबर लाभणारे १६० गुण महत्त्वाचे ठरतील.

चेन्नईतील एटीपी रद्द होणार असे दिसतानाच ही स्पर्धा महाराष्ट्रात होत आहे. आता त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने या स्पर्धेचे यजमानपद मिळविले आहे. ‘अंकिता रैना, कारमान कौर थांडी, ऋतुजा भोसले यांना या स्पर्धेमुळे डब्ल्यूटीए स्पर्धेत खेळण्याची संधी लाभेल. खेळाडूंना खेळण्याचा रस कायम राखण्यासाठी या प्रकारच्या स्पर्धेची गरज असते, असे राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

यापूर्वीची भारतातील डब्ल्यूटीए स्पर्धा २०१२ मध्ये पुण्यात झाली होती. त्या स्पर्धेतील विजेती एलिना स्विटोलिनासध्या जागतिक क्रमवारीत पाचवी आहे. या स्पर्धेसाठी संयोजक मुख्य ड्रॉसाठी चार वाईल्ड कार्ड देऊ शकतील; तसेच पात्रता स्पर्धेतही चौघींना प्रवेश देता येईल. देशातील अव्वल चौघींनाच ही वाईल्ड कार्ड मिळतील. सध्या अंकिता (२६२), कारमान (३४९), राष्ट्रीय विजेती रिया भाटिया (५१९) यांना त्यांच्या मानांकनानुसार डब्ल्यूटीए स्पर्धेत थेट प्रवेश मिळत नाही. या स्पर्धेत नक्कीच जागतिक दर्जाच्या खेळाडू असतील. ऑस्ट्रेलियन स्पर्धेपूर्वी मानांकन उंचावण्याची ही त्यांना संधी असेल, असेही अय्यर यांनी सांगितले.