सलग चौथ्या वर्षी अनिता हतोडाफेकीत सर्वोत्कृष्ट

पीटीआय
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

लंडन - पोलंडची विश्‍वविजेती अनिता व्लोडरस्की हिने सलग चौथ्या वर्षी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाची हतोडाफेक चॅलेंज स्पर्धा जिंकली आहे. पुरुष विभागतही पोलंडचा विश्‍वविजेता पावेल फॅदेक सर्वोत्कृष्ट ठरला.

सलग तिसऱ्या वर्षी अनिता एकाही स्पर्धेत पराभूत झालेली नाही. प्रथम १२ विजेत्यांना रोख पुरस्कार देण्यात येणार असून विजेतीला ३० हजार अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार मिळेल. जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या चीनच्या वॅंग झेनला दुसरे तर अझरबैजानच्या हॅना स्कायदानला तिसरे स्थान मिळाले. पुरुषांत तीन वेळच्या  विश्‍वविजेता पावेल फॅदेकने २४८.४८ गुणांसह बाजी मारली. त्याचा सहकारी विश्‍व व  ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळविणाऱ्या वोसिज नोविस्कीला दुसरे तर रिओ ऑलिंपिक  विजेत्या तजाकिस्तानच्या दिलशोद नाझारोवला तिसरे स्थान मिळाले.