स्क्वॅशपटू जोश्‍नाची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अल गौना (इजिप्त)  - भारताच्या जोश्‍ना चिनाप्पाने जागतिक स्क्वॅश स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीत ऍलिसन वॉटर्सवर संघर्षपूर्ण विजय मिळविला. जागतिक क्रमवारीत जोश्‍ना 12व्या, तर ऍलिसन आठव्या क्रमांकावर आहे. एक तास सहा मिनिटे चाललेल्या लढतीत 11-5, 7-11, 9-11, 11-8, 11-9 असा विजय मिळविला. जोश्‍ना तीस वर्षांची आहे. तिला बारावे मानांकन आहे. निर्णायक गेममध्ये तिने सरस खेळ केला. आधीच्या फेरीत तिने जपानच्या मिसाकी कोबायाशीवर 13-11, 11-8, 12-10 असा विजय मिळविला होता. इंग्लंडची एमिली व्हिटलॉक आणि द्वितीय मानांकित फ्रान्सची कॅमिली सेर्मी यांच्यातील विजयी खेळाडूशी तिची लढत होईल.