एका आठवड्यातच श्रीकांत पाचव्या स्थानी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई -  अवघ्या एका आठवड्यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलेल्या किदांबी श्रीकांतची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. गतवर्षीचे सिंगापूर उपविजेतेपद तो मानांकनाच्या कालावधीत राखू न शकल्याचा फटका त्याला बसला.

खरे तर श्रीकांतने सरत्या आठवड्यात चांगली कामगिरी करताना राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटनच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक तसेच वैयक्तिक रौप्यपदक जिंकले होते, पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरी जागतिक मानांकनाचा विचार करताना लक्षात घेतली जात नाही.जागतिक मानांकन तयार होताना गेल्या वर्षभरातील सर्वोत्तम १० स्पर्धांतील कामगिरी लक्षात घेतली जाते. पुरुष एकेरीत केवळ एच. एस. प्रणॉयचीच प्रगती झाली. तो पुन्हा टॉप टेनमध्ये गेला आहे.

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने तिसरे आणि साईना नेहवालने बारावे स्थान राखले आहे, पण जपानच्या अकेन यामागुची हिने पहिल्यांदा अव्वल क्रमांक मिळवताना तैवान तई झु यिंग हिला मागे टाकले आहे. गेले पाच महिने यामागुची दुसऱ्या क्रमांकावर होती. 

Web Title: Srikanth fifth place in a week