इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेत चौरासिया विजेता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

गुरगाव - भारताचा आघाडीचा गोल्फ खेळाडू एस. एस. पी. चौरासिया याने सलग दुसऱ्यांदा इंडियन ओपन गोल्फ स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली, अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा गोल्फ खेळाडू ठरला.

विजेतेपदासाठी त्याला रोख एक कोटी 94 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.

आशियाई मालिका तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चौरासियाचे सहावे विजेतेपद ठरले. चौरासियाने अखेरच्या होलचे लक्ष्य साधताना अचूक कामगिरी करताना 278 दोषांकासह विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेचे विजेतेपद राखणारा चौरासिया एकूणात तिसरा, तर दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी ज्योती रंधवा (भारत, 2006,07), जपानचा केंजी हौशिशी (1967, 68) यांनी अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा भारतीय खेळाडूने जिंकण्याची हॅटट्रिक झाली. चौरासियापूर्वी 2015 मध्ये अनिर्बन लाहिरीने ही स्पर्धा जिंकली होती.

चौरासियाने स्पेनच्या कार्लोस पायगेम याच्यावर दोन स्ट्रोक्‍सची आघाडी घेतली होती. मात्र, अखेरच्या दिवशी रविवारी कार्लोसला चौथ्या होलवर अपयश आले, तर चौरासियाने "बर्डी' घेत आपला विजय निश्‍चित केला. अखेरच्या फेरीत 69 दोषांकाची कमाई करत भारताचा लाहिरी संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर राहिला.