रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

क्रिकेट आणि हॉकीत आमने-सामने 

मुंबई,: भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील लढतीचा डबल धमाका क्रीडाचाहत्यांना रविवारी अनुभवता येणार आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आणि देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये एकाच वेळी या लढती होणार आहेत. 

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत व पाकिस्तान यांच्यातील अंतिम लढत ओव्हलवर आहे. त्यापासून अंदाजे 16 किलोमीटरवरील ली व्हॅली हॉकी ऍण्ड टेनिस सेंटरवर वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यात भारत व पाकिस्तानमध्ये साखळी लढत होईल. अर्थातच या दोन्ही लढतींच्या सुरळीत आयोजनाचे दडपण लंडनमधील सुरक्षा यंत्रणेवर असेल. काही दिवसांतील लंडनमधील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या लढतीसाठी जास्त कडक बंदोबस्त असेल. 
चॅम्पियन्स करंडकातील लढत भारताची क्रिकेटमधील हुकुमत सिद्ध करेल; तर पकिस्तानला वर्ल्ड हॉकी लीगच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरण्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची हॉकीत पीछेहाट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. हॉकी लीगचा अंतिम टप्पा भारतातच असल्यामुळे भारतावर पात्रतेचे दडपण नाही; पण प्रतिष्ठेसाठी या लढतीतील विजय आवश्‍यक असेल.