'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदी विनोद राय

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय यांची आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केली.

अनुराग ठाकुर यांची हकालपट्टी केल्यापासून 'बीसीसीआय'चे अध्यक्षपद रिक्त होते. सर्वोच्च न्यायालयाने राय यांची अध्यक्षुदी नियुक्ती केली असून, इतिहासकार रामचंद्र गुहा व विक्रम लिमये यांची प्रशासकीय पॅनलवर नियुक्ती केली आहे. भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी यांनाही प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे.

'बीसीसीआय'मधील नियुक्त्या करताना क्रीडामंत्रालयाच्या सचिवांना प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्याची केंद्र सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीला 'बीसीसीआय'कडून अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी व विक्रम लिमये उपस्थित राहणार आहेत.