कलमाडी, चौटाला ऑलिंपिक समितीत

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेने मंगळवारी आश्‍चर्यकारक निर्णय घेताना सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची अनुक्रमे तहहयात आश्रयदाते आणि अध्यक्ष म्हणून निवड केली.

सुरेश कलमाडी यांच्यावर 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या वेळी कलमाडी भारतीय ऑलिंपिक संघटना आणि राष्ट्रकुल संयोजन समितीचे अध्यक्ष होते. याच भ्रष्टाचार प्रकरणात कलमाडी यांना 2014 मध्ये अटकदेखील करण्यात आली होती. यानंतरही 2015 मध्ये त्यांना ऍथलेटिक्‍समध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आशियाई ऍथलेटिक्‍स संघटनेच्या अध्यक्षीय पदकाने गौरविण्यात आले होते.

त्याचबरोबर अभयसिंह चौटाला यांच्या अध्यक्षाच्या निवडीस आक्षेप घेत भारतीय ऑलिंपिक संघटनेस निलंबित करण्यात आले होते. मात्र, घटनाबदल झाल्यावर त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतरही रिओ ऑलिंपिकमध्ये त्यांचा भारतीय पथकाबरोबरचा वावर भुवया उंचावणारा ठरला होता. चौटालाच अध्यक्ष असताना 2012 मध्ये भारतीय बॉक्‍सिंग महासंघाचीही मान्यता रद्द करण्यात आली होती.

क्रीडा

मुंबई - विश्‍वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील दोन दशकांपूर्वीच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या आठवणींना उजाळा देणारी...

10.24 AM

न्यूयॉर्क - आगामी अमेरिकन ओपन या मोसमातील अखेरच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेसाठी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिला ‘वाईल्ड कार्ड’...

10.24 AM

लंडन - न्यूझीलंडची कर्णधार सूझी बेटस्‌ हिने किआ सुपर लीग टी-२० स्पर्धेत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. तिने अवघ्या ६३ चेंडूंत...

10.09 AM