अखेर महिला कुस्तीपटू विनेशचा माफीनामा; पण...

टोकियोतील स्पर्धेदरम्यान विनेश फोगटने टीमसोबत असलेल्या इतर खेळाडूंसोबत राहण्यास नकार दिला होता. एवढेच नाही तर तिने सहकाऱ्यांसोबत ट्रेनिंग करण्यासही बगल दिली होती.
vinesh phogat
vinesh phogatsakal

महिला कुस्तीपटू विनेश फोगटने निलंबनाच्या कारवाईनंतर अखेर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील असभ्य वर्तनाबद्दल माफी मागितलीये. जगातील मानाच्या स्पर्धेत विशेन फोगट ((wrestler Vinesh Phogat ) 53 किलो वजनी गटातून आखाड्यात उतरली होती. जागतिक क्रमवारीत आपल्या गटात अव्वस्थानी असलेल्या विनेश फोगटकडून पदकाची आस होती. पण तिला क्वार्टर फायनलमध्येच धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. टोकियोतील स्पर्धेदरम्यान विनेश फोगटने टीमसोबत असलेल्या इतर खेळाडूंसोबत राहण्यास नकार दिला होता. एवढेच नाही तर तिने सहकाऱ्यांसोबत ट्रेनिंग करण्यासही बगल दिली होती.

यात आणखी भर म्हणजे तिने भारतीय संघाच्या अधिकृत प्रायोजकाशिवाय खासगी प्रायोजकाचे नाव असलेल्या जर्सीसह आखाड्यात उतरण्याला पसंती दिली होती. याची किंमत तिला मोजावी लागत आहे. तिचे हे वर्तन असभ्य असून शिस्तभंगाच्या नियमानुसार तिच्यावर निलंबनाची करण्यात आल्याची माहिती भारतीय कुस्ती महासंघाने दिली होती. निलंबनाच्या कारवाईनंतर आता विनेश फोगटने माफी मागितली असली तरी तिला खेळण्याची परवानगी मिळणे मुश्किलच दिसते.

vinesh phogat
IND vs ENG 'विराट' मासा लागला सॅमच्या गळाला; टीम इंडिया संकटात

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये विनेश फोगटला बेलारुसच्या वॅनेसा कलाडजिंस्काया हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीनंतर कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्याने विनेश फोगटच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तिचे वर्तन हे वरिष्ठ खेळाडूला शोभनिय नाही, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर कुस्ती महासंघाकडून तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तिने जरी माफी मागितली असली तरी आगामी वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तिला संघात समावेश करणे मुश्कील असल्याची चर्चा रंगत आहे.

vinesh phogat
INDvsENG 15 मिनिटे 10 बॉलचं षटक; बुमराहनं केला नो बॉलचा कहर

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकासह एकूण 7 पदकाची कमाई करत आतापर्यंतची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. एका बाजूला याचा जल्लोष सुरु असताना दुसऱ्या बाजुला दुसऱ्यांदा पदकापासून वंचित राहिलेल्या विनेश फोगटवर असभ्य वर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला. ऑलिम्पिकमधील पराभवाने निराश झाले आहे. आखाड्यात पुन्हा येऊन की नाही याची शंका वाटते, असे विनेश म्हणाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com