'टॉप' समितीच्या अध्यक्षपदी नेमबाज अभिनव बिंद्राची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

नवी दिल्ली - भारताचा "गोल्डन फिंगर' अभिनव बिंद्रा याची क्रीडा मंत्रालयाने आपल्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम (टॉप) समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. समितीत माजी धावपटू पी. टी. उषा आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचाही समावेश आहे. बिंद्रा यापूर्वीच्या समितीतही होता. मात्र, रिओ ऑलिंपिकच्या तयारीसाठी त्याने आपले नाव मागे घेतले होते.

दहा सदस्यीय समितीत अंजली भागवत, कर्णम मल्लेश्‍वरी या आणखी दोन खेळाडूंचा समावेश आहे. अन्य पाच जणांत अनिल खन्ना, पी. के. मुरलीधरन राजा, रेखा यादव, एस. एस. रॉय या क्रीडा प्रशासकांसह क्रीडा सहसचिव इंदर धमिजा यांचा समावेश आहे. या समितीवर 2020 आणि 2024 ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकू शकणाऱ्या देशातील क्रीडा गुणवत्तेचा शोध घेण्याची जबाबदारी असेल. या समितीची मुदत नियुक्तीपासून एक वर्षाची राहणार आहे.