ट्विटमुळे ३० लाखांनी वाढला वीरूचा बॅंक बॅलन्स!

पीटीआय
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नवी दिल्ली- ट्विटरच्या खेळपट्टीवरील ‘वीरू के शोले’ सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय असतो. षटकार ठोकून त्रिशतक पूर्ण करणाऱ्या सेहवागच्या ट्विटही जोरदार असतात. कधी विडंबन, कधी विनोद, कधी गंभीर विषयावर हलक्‍याफुलक्‍या शब्दांमधून सूचक संवाद, आजी-माजी सहकाऱ्यांसह प्रतिस्पर्ध्यांना वाढदिवसाचे संदेश असे वैविध्य त्यात दिसते. अशाच ट्विटमुळे सेहवागला गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३० लाख रुपयांची कमाई झाली आहे.

सरत्या वर्षात सेहवागच्या फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. बहुतांश भारतीय क्रिकेटपटू ट्विटरवर फारसे ‘ॲक्‍टिव्ह’ नसतात. सेहवाग मात्र नित्यनेमाने ट्विट करतो. त्याच्या ट्विट अनेक चाहते रीट्विट किंवा शेअर करतात. त्यामुळे प्रायोजकांचे लक्ष याकडे वेधले गेले. ट्विट आणि रीट्विटच्या संख्येनुसार सेहवागला ठराविक रक्कम मिळण्यास सुरवात झाली. विशेष म्हणजे प्रायोजकांची संख्याही वाढू लागली.

ट्विटरला केवळ १४० कॅरॅक्‍टर्सची मर्यादा असते. सेहवाग फलंदाज म्हणून किमान फुटवर्कच्या जोरावर कमाल धावा वसूल करायचा. अलीकडेच त्याने पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्‍ताकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या वेळी त्याने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला. सेहवागने मुलतान कसोटीत सकलेनलाच षटकार खेचत त्रिशतक पूर्ण केले होते. त्रिशतक झळकाविलेला तो पहिलाच भारतीय फलंदाज बनला. या खेळीमुळे त्याला ‘मुलतान का सुलतान’ असे बिरूद लाभले. या ऐतिहासिक षटकाराचा व्हिडिओ शेअर करीत तो ‘एन्जॉय’ करावा, असेही त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते.