बारा वर्षांखालील सर्वांचीच क्रीडा गुणवत्ता जाणणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा स्तरावर भारताची कामगिरी उंचावण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने विविध उपाय सुरू केले आहेत. क्रीडा गुणवत्तेचा शोध करण्यासाठी लवकरच एक खास संकेतस्थळ सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर आता देशातील बारा वर्षांखालील सर्व मुला-मुलींची गुणवत्ता जाणून घेण्याचाही विचार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले.

देशभरातील सर्व राज्यांतील क्रीडामंत्री आणि क्रीडा सचिवांची एकदिवसीय परिषद नवी दिल्लीत आज झाली. या परिषदेचे उद्‌घाटन करताना गोयल यांनी या योजनेची माहिती दिली. ते म्हणाले की, १२ वर्षांपर्यंतच्या मुलांची सर्व माहिती जाणून घेण्यात येईल आणि १२ ते १६ वयोगटातील कोणत्या मुलांना खेळाची आवड आहे हे पाहण्यात येईल. मुलांच्या कामगिरीचे व्हिडिओ, छायाचित्रेही या संकेतस्थळावर अपलोड करता येतील. खेळाडूंच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यावर उच्चस्तरीय चाचणी होईल. चांगली क्षमता असलेल्या मुलांना क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल, असेही गोयल यांनी सांगितले.
 
आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी पैसा नव्हे, तर योग्य दृष्टिकोन, तसेच लक्ष्याच्या दृष्टीने प्रयत्न महत्त्वाचे आहेत. सरकारने क्रीडा सुविधा, तसेच मार्गदर्शक तयार करायला हवेत. उच्च स्तरावरील मार्गदर्शनासाठी चांगले क्रीडापटू आपल्याकडे आहेत. प्रत्येक राज्यातील यशस्वी होतील असे ५० गुणवान खेळाडू शोधण्याची गरज आहे. 
- राजवर्धन राठोड, माजी ऑलिंपिक पदकविजेते, तसेच माहिती आणि प्रसारणमंत्री