आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत लार्लिनुन्गाला दोन पदके

jerami
jerami

नवी दिल्ली - भारताच्या जेरेमी लार्लिंनुन्गा याने युवा आशियाई वेटलिफ्टंग स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात राष्ट्रीय विक्रमासह रौप्य आणि ब्राँझपदक मिळविले. ही स्पर्धा उझबेकिस्तान येथे सुरू आहे. भारताच्या १५ वर्षीय जेरेमी याने दोन्ही गटात २५० किलो वजन उचलून ही विक्रमी कामगिरी केली. याच वजनी गटात युवा विभागात भारताचा सिद्धांत गोगोई २४३ किलो वजनी उचलून रौप्यपदकाचा मानकरी ठरली. त्यापूर्वी जिगिली डालाबेहेरा (४८ किलो) हिने कुमार गटात १६६ किलो वजन उचलून रौप्य, तर याच वजनी गटात स्नेहा सोरेन हिने १४५ किलो वजनी उचलून युवा विभागात ब्राँझपदक मिळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com