आणखी दोन-तीन वर्षे खेळेन - फेडरर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पर्थ - ‘टेनिस कारकिर्दीच्या भवितव्याचा आढावा घेताना मी दीर्घकाळाचा विचार करतो आहे. आणखी दोन किंवा तीन वर्षे खेळण्याची मला आशा आहे,’ असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडरर याने केले.

फेडरर होपमन करंडक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशभगिनी बेलिंडा बेन्चीच त्याची जोडीदार आहे. जुलै महिन्यात विंबल्डनमध्ये त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. त्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.

त्यामुळे फेडररला मोठा ‘ब्रेक’ घ्यावा लागला. ३५ वर्षांच्या फेडररला पुनरागमनानंतर कामगिरी कशी होईल याची नेमकी कल्पना नाही, पण आपल्या विचारप्रक्रियेत निवृत्तीला स्थान नसल्याचे त्याने आवर्जून नमूद केले. कारकिर्दीत विक्रमी १७ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविलेल्या फेडरर म्हणाला की, ‘मला निवृत्तीबद्दल विचारले जाते तेव्हाच मी अशा गोष्टींचा विचार करतो. हा माझा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकेल का, असे चित्र मी कधी पाहात नाही. तसे कदाचित होऊसुद्धा शकेल, पण मी फार सकारात्मक आहे.’