विराट-अनुष्काने श्रीलंकेत केले वृक्षारोपण

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली आहे. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत विराटने अनुष्कासोबत वृक्षारोपण केल्याचे समोर आले आहे.

कोलंबो - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेमसंबंध सर्वांनाच माहिती असताना आता या दोघांच्या प्रेमाचे रोपटे श्रीलंकेत बहरताना दिसणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली आहे. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत विराटने अनुष्कासोबत वृक्षारोपण केल्याचे समोर आले आहे. विराट आणि अनुष्का वृक्षारोपण करतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या दोघांनी या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश दिला आहे.

विराट, अनुष्का आणि रवी शास्त्री यांनी श्रीलंकेतील आपल्या चाहत्यांची भेट घेतली होती. आता हे वृक्षारोपणाचे फोटो समोर आले आहेत. कँडी शहरात या दोघांनी वृक्षारोपण केले.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :