साखरपुडा झाला तर कळवेनच की...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

विराट कोहलीने आपल्या स्टाइलमध्ये केला संभ्रम दूर

मुंबई - काही दिवसांपूर्वी मैदानावरील दिमाखदार कामगिरीमुळे चर्चेत राहिलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आता लव्ह बर्ड म्हणून पुन्हा चर्चेत आला आहे. नववर्षाची चाहुल लागलेली असताना प्रसिद्धिमाध्यमांनाही विराट आणि अनुष्का यांच्या साखरपुड्याचे वेध लागले... तसे वृत्तही प्रसिद्ध होऊ लागले, पण कधीच कोणाचे ‘उसने’ ठेवण्याचा स्वभाव नसलेल्या विराटने, ‘‘साखरपुडा झाला तर तुम्हाला सांगूच, लपवणार नाही!’’, अशा शब्दात उत्तर दिले.

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला १५ जानेवारीपर्यंत सध्या ब्रेक आहे. सुटीची ही संधी साधून विराट-अनुष्का ऋषिकेश येथे आलेले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या दोघांचा वाङ्‌न्÷िनश्‍चय होण्याची चर्चा सुरू झाली. याच शहरात बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन तसेच अनिल अंबानीही दाखल झाल्यामुळे विराट-अनुष्काच्या वृत्ताला बळकटी येऊ लागली होती.
क्रिकेटच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धचे हिशेब नुकतेच चुकते करणाऱ्या विराट कोहलीने अशा अफवांना उत्तर दिले नसते, तरच नवल होते. ट्विटरवरून त्याने थोडक्‍यात खुलासा करून चर्चेला पूर्णविराम दिला. 
 
आम्ही साखरपुडा करत नाही हो, आणि जर केला तर तुमच्यापासून लपवणार नाही... सिंपल, टीव्ही चॅनेल्स अफवा पसरवण्यापासून थांबत नाही आणि तुम्हाला गोंधळात टाकत असतात, त्यामुळे मी तुमचा संभ्रम दूर करत आहे.
- विराट कोहली