IND vs WI: विराट-रोहित विक्रमाच्या उंबरठ्यावर; सचिन-सौरव जोडीच्या पक्तींत बसण्याची संधी

Virat Kohli Rohit Sharma Batting pair 94 runs away from milestone of 5000 ODI partnership runs
Virat Kohli Rohit Sharma Batting pair 94 runs away from milestone of 5000 ODI partnership runs ESAKAL

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. या मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांचे इक्वेशन कसे असणार हा चर्चेचा विषय आहे. असे असले तरी या दोघांनाही फलंदाजीची जोडी म्हणून एक मैलाचा दगड (Milestone) पार करण्याची संधी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांमधील नात्याची चर्चा कायम होत असते. मात्र या दोघांनी फलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ज्यावेळी हे दोन स्टार फलंदाज एकत्र क्रीजवर असतात त्यावेळी विरूद्ध संघावर प्रचंड दबाव निर्माण करतात. (Virat Kohli Rohit Sharma Batting Pair 94 Runs Away from Milestone of 5000 ODI Partnership Runs)

Virat Kohli Rohit Sharma Batting pair 94 runs away from milestone of 5000 ODI partnership runs
इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही राजीनाम्याचा संसर्ग; लँगरनी सोडले पद

विराट-रोहित जोडीने वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) आतापर्यंत 4906 धावांची भागीदारी रचली आहे. त्यांना 5000 च्या क्लबमध्ये सामिल होण्यासाठी फक्त 94 धावांची गरज आहे. ते सध्या वनडेमध्ये सर्वाधिक भागीदारीतल्या धावांच्या यादीत आठव्या क्रमाकावर आहेत. या यादीत सर्वात टॉपवर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरभ गांगुली (Surav Ganguly) यांची जोडी आहे. त्यांनी 176 डावात 8227 धावा केल्या आहेत.

Virat Kohli Rohit Sharma Batting pair 94 runs away from milestone of 5000 ODI partnership runs
पहिला U19 वर्ल्डकप जिंकणारा निम्मा भारतीय संघ खेळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट!

विराट-रोहित जोडीच नाही तर रोहित-शिखर (Rohit Sharma and Shikhar Dhawan Record) जोडी देखील वनडेमध्ये भागीदारी रचण्यात आघाडीवर आहे. 5000 धावांची भागीदारी रचणाऱ्यांच्या यादीत भारताची ही दुसरी जोडी आहे. त्यांनी 112 डावात 5023 धावा केल्या आहेत. मात्र विराट-रोहित (Rohit Sharma Virat Kohli Pair) जोडीची बातच काही और आहे. कारण या जोडीने भागीदारीच्या 5000 धावा पूर्ण केल्या तर ही जोडी भागीदारीत सर्वात वेगवान 5000 धावा करणारी जोडी ठरणार आहे. त्यांनी 81 डावात 4906 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी देखील 64.55 इतकी आहे. बाकीच्या सर्व जोड्यांनी वनडे क्रिकेटमध्ये भागीदारीत 5000 धावा करण्यासाठी 100 पेक्षा जास्त डाव घेतले आहेत.

Virat Kohli Rohit Sharma Batting pair 94 runs away from milestone of 5000 ODI partnership runs
U19 WC Final : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?; मॅच कुठे पाहाल?

रोहित शर्माने नुकतीत विराट कोहलीकडून वनडे संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहे. जर रोहित-विराट जोडीने विंडीज मालिकेत 94 धावांची भागीदारी रचली तर रोहित हा दोन फलंदाजांबरोबर भागीदारीत प्रत्येकी 5000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी कुमार संगकाराने दोन फलंदाजांबरोबर वनडेमध्ये 5000 धावांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने महेला जयवर्धने बरोबर 5992 तर तिलकरत्ने दिलनशानबरोबर 5475 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com