समुद्रकिनारी रंगला अनुष्का - विराटचा क्रिकेटचा डाव

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे
virat kohli wife anushka sharma enjoying beach holiday ind vs sa cricket
virat kohli wife anushka sharma enjoying beach holiday ind vs sa cricket

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटक येथे बाराबती स्टेडियम मालिकेतील दुसरा T20 सामना खेळला जात आहे. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातच कोहली भारताकडून खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो समुद्रकिनाऱ्यावर एकटा बसलेला आहे.(virat kohli wife anushka sharma enjoying beach holiday)

विराट कोहलीने हा फोटो पोस्ट करताच पहिल्या तासाभरात २० लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे. भारतात विराटबाबत वेगळीच क्रेझ आहे. विराट कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे इंस्टाग्रामवर भारतात सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. जगातील सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. अनुष्का शर्माने याआधी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, ज्यावर तिने कॅप्शन दिले होते की, जेव्हा तुम्ही स्वतःचा फोटो क्लिक करता. सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.

कोहलीच्या या पोस्ट वर लोकांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. विराट कोहलीचे अलीकडेच २० कोटी फॉलोअर्स झाले आहे. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला असून त्याआधी प्रथमच 100 दशलक्ष फॉलोअर्सचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, ज्यात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. भारताला जिथे एक उर्वरित कसोटी सामना खेळायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com