फुटबॉल खेळतो तेव्हा मी रोनाल्डो असतो: विराट 

वृत्तसंस्था
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

भारतीय संघ सरावापूर्वी किंवा सामन्यापूर्वी वॉर्मअप करताना विराट फुटबॉल खेळण्यास प्राधान्य देतो. एवढेच नव्हे तर तो फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे खेळण्याचा प्रयत्नही करतो.

हैदराबाद : केवळ भारतीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सध्याचा सुपरस्टार विराट कोहली फुटबॉलचाही मोठा चाहता आहे.

भारतीय संघ सरावापूर्वी किंवा सामन्यापूर्वी वॉर्मअप करताना विराट फुटबॉल खेळण्यास प्राधान्य देतो. एवढेच नव्हे तर तो फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे खेळण्याचा प्रयत्नही करतो. जेव्हा मी फुटबॉल खेळतो, तेव्हा मी रोनाल्डो असतो, असे त्याने म्हटले आहे. तो रोनाल्डो आणि त्याच्या रेआल माद्रिदचा पाठीराखा आहे.

विराट आयएसएलमध्ये एका संघाचा सहमालकही आहे. संधी मिळते तेव्हा तो फुटबॉल खेळत असतो. मुंबईत पुढील महिन्यात क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार यांच्यात अंधेरीत प्रदर्शनी फुटबॉल सामना होणार आहे. त्या सामन्यात विराट क्रिकेटपटू फुटबॉल संघाचे नेतृत्व करणार आहे.