आनंदची अरोनियनशी बरोबरी 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

जलद बुद्धिबळातील जगज्जेता विश्‍वनाथन आनंद याने मंगळवारपासून सुरू झालेल्या नॉर्वे चेस स्पर्धेत पहिल्या फेरीत लेवॉन अरोनियनशी बरोबरी साधली. या स्पर्धेपूर्वी झालेल्या ब्लिट्‌झ स्पर्धेत आनंद तिसऱ्या स्थानावर राहिला होता. पहिल्या फेरीत झालेल्या पाचपैकी चार लढती बरोबरीत राहिल्या.

स्टॅव्हॅंजर (नॉर्वे) - जलद बुद्धिबळातील जगज्जेता विश्‍वनाथन आनंद याने मंगळवारपासून सुरू झालेल्या नॉर्वे चेस स्पर्धेत पहिल्या फेरीत लेवॉन अरोनियनशी बरोबरी साधली. या स्पर्धेपूर्वी झालेल्या ब्लिट्‌झ स्पर्धेत आनंद तिसऱ्या स्थानावर राहिला होता. पहिल्या फेरीत झालेल्या पाचपैकी चार लढती बरोबरीत राहिल्या.

एकमात्र विजय जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने नोंदवला. त्याने आपला आगामी आव्हानवीर फॅबिआनो कॅरुआनावर मात केली. 
 

Web Title: Viswanathan Anand equals to Aronian