विम्बल्डनसाठी रशियन खेळाडूंवर बंदी

जागतिक दुसऱ्या क्रमांकावरील मेदवेदेवसह इतर खेळाडूंवरही परिणाम
wimbledon ban russian tennis gh mhdo London
wimbledon ban russian tennis gh mhdo Londonsakal

लंडन : युक्रेनवरील रशियाचे आक्रमण आणि बेलारूसने युद्धाला दिलेला पाठिंबा याला प्रत्युत्तर म्हणून, विम्बल्डन या स्पर्धेचे आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब यांनी रशियन आणि बेलारुसच्या खेळाडूंवर २७ जूनपासून येथे सुरू होणाऱ्या ‘ग्रँडस्लॅम’ टेनिस स्पर्धेसाठी बंदी घातली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण करून मानवी हक्कांची पायमल्ली केल्यानंतर जगभर त्यांच्याविरोधात बंदीचा सूर आहे. विम्बल्डनच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॅनिल मेदवेदेववर होणार आहे. या निर्णयामुळे मेदवेदेवचे हंगामातील तिसऱ्या ‘ग्रँडस्लॅम’मध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले जाईल.

या वर्षाच्या सुरुवातीला काही काळ एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झालेल्या मेदवेदेवसह आंद्रे रुब्लेव्ह (क्रमांक ८), कॅरेन खाचानोव्ह (क्रमांक २६) आणि अस्लन करातसेव्ह (क्रमांक ३०) या पुरुष गटातील तसेच अनास्तासिया पावल्युचेन्कोवा व डारिया कासात्किना या महिला खेळाडूंना या निर्णयाचा फटका बसेल. रशियासह बेलारूसच्याही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बेलारूसची दोन वेळा ‘ग्रँडस्लॅम’ विजेती व्हिक्टोरिया अझारेन्का, आर्यना सबालेन्का आणि १८ क्रमांकावरील व्हिक्टोरिया अझारेंका यांनाही स्पर्धेपासून दूर रहावे लागेल.

पुतिन यांचा निषेध केल्यानंतरच परवानगी

‘‘रशियाचा ध्वज फडकावणाऱ्या कोणत्याही खेळाडूला खेळण्याची परवानगी देऊ नये, तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून व्लादिमीर पुतिन यांचा निषेध करणारे पत्र लिहून घेतल्यानंतरच त्यांना खेळण्याची परवानगी द्यावी,’’ असे ब्रिटनचे क्रीडा मंत्री निगेल हडलस्टन यांनी मार्चमध्ये म्हटले होते. त्यानंतर त्यांनी विम्बल्डन आयोजकांशी यासंबंधित चर्चा केल्याचीही माहिती आहे. त्यानंतरच हा बंदीचा निर्णय घेतला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com