या वेळचीही ‘दंगल’ आम्हीच जिंकू!

कुस्ती लिगमधील मुंबई महारथी संघाच्या लोगोच्या अनावरणप्रसंगी राहुल आवारे आणि एरिका वेब.
कुस्ती लिगमधील मुंबई महारथी संघाच्या लोगोच्या अनावरणप्रसंगी राहुल आवारे आणि एरिका वेब.

मुंबई - भरभक्कम आणि समतोलपणा हा आमचा कणा आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही यंदाही कुस्ती लीगचे विजेतेपद मिळवू, असा विश्‍वास मुंबई संघातील हुकमी खेळाडू आणि ऑलिंपिक विजेती एरिका वेब, तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक रामपहल मान यांनी व्यक्त केला. 

यंदाची कुस्ती लीग येत्या सोमवारपासून दिल्लीतील खाशाबा जाधव स्टेडियममध्ये सुरू होत आहे. आज मुंबई महारथी संघाच्या लोगोचे अनावरण झाले. दुसऱ्या कुस्ती लीगचे विजेतेपद राखण्याची क्षमता आमच्या संघात आहे, असे प्रशिक्षक रामपहल मान यांनी या वेळी सांगितले.

आमचा संघ समतोल आणि पूर्ण तंदुरुस्त आहे, असे सांगून मान म्हणाले, ‘अनुभवी आणि उदयोन्मुख हे सूत्र आम्ही संघ तयार करताना बाळगले. सर्व वयोगटांत उतरणारा आमचा मल्ल सर्वोत्तम असेल, यावरही आम्ही भर दिला. एरिका ही आमच्यासाठी हुकमी एक्का असेल.

ऑलिंपिक विजेती एरिका सध्या तिच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. गतवर्षी ऑलिंपिकची तयारी करत असल्यामुळे मला कुस्ती लीगमध्ये सहभागी होता आले नव्हते. कुस्ती ही विश्‍वातील सर्वांत मोठी लीग असल्यामुळे या स्पर्धेत खेळण्यास मी उत्सुक होते. यासाठी मी कसून सराव केला आहे आणि मुंबई महारथी संघाला विजेतेपद राखण्यासाठी मी सर्वस्व पणास लावेन, असे एरिकाने सांगितले.

मुंबईचे महारथी
मुंबई संघात कॅनडाच्या एरिका वेबसह कोलंबियाची कॅरोलिना कॅस्टिलो हिडाल्गो या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह रिओ ऑलिंपिक ब्राँझपदक आणि विश्‍व अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता अझरबैजानचा जाबरयील हासनदोव, युक्रेनचा पालोव ओलियंक हे आंतरराष्ट्रीय पुरुष मल्ल, तसेच सरिता मूर, ललिता शेरावत, राहुल आवारे, प्रितम दलाल आणि विकास डागर हे ‘महारथी’ आहेत.

सरिता ही राष्ट्रीय विजेती आहे आणि २०१४ पासून तिने विजेतेपदाची हॅट्ट्रिक केलेली आहे. २०१६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवलेले आहे. राहुल हा राष्ट्रकुल, तसेच आशियाई विजेतेपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. 
 

असा आहे कार्यक्रम
मुंबईची सलामीची लढत २ जानेवारीला हरियानाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर पंजाब (५ जानेवारी), उत्तर प्रदेश (७), जयपूर (९) आणि दिल्ली (१३) अशा लढती होणार आहेत. १७ आणि १८ जानेवारीला उपांत्य सामने आणि १९ जानेवारीला अंतिम लढत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com