सुपरक्रॉसमध्ये युवराज विजेता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

पुणे - पुण्याचा उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे-देशमुख याने कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला क्रमांक मिळविला. बेळगावमध्ये रविवारी ही स्पर्धा पार पडली. 

युवराजने मार्च महिन्यात मलेशियात झालेल्या आशियाई मोटोक्रॉस स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला होता. तो मूळचा खेडशिवापूरचा आहे. १२ वर्षांचा युवराज यानंतर आशियाई मालिकेतील तिसऱ्या फेरीत सहभागी होईल. ही स्पर्धा फिलिपिन्समध्ये ११ जून रोजी होईल. युवराज अजमेरा आय-लॅंड रेसिंग ॲकॅडमीत रुस्तम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.