VIDEO : चहल चमकला! बायको सोडा सासूबाईंनीही लगावले ठुमके

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma And Her Mother Dance Gone Viral After 3rd T20I India vs South Africa
Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma And Her Mother Dance Gone Viral After 3rd T20I India vs South Africa esakal

विशाखापट्टणम : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा टी 20 सामना जिंकत मालिकेतील आव्हान कायम ठेवले. भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी 180 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेचा डाव 131 धावातच गुंडाळला. युझवेंद्र चहलने 20 धावात 3 बळी घेतले. तर हर्षल पटेलने 25 धावा देत 4 बळी टिपले. मोक्याच्या क्षणी आफ्रिकेला धक्के देणाऱ्या चहलला सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma And Her Mother Dance Gone Viral After 3rd T20I India vs South Africa)

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma And Her Mother Dance Gone Viral After 3rd T20I India vs South Africa
पोर्तुगालमध्ये झालेल्या केटलबेल स्पर्धेत भारताला रौप्य पदक

पहिल्या दोन सामन्यात सुमार गोलंदाजी केल्यानंतर चहल चमकला, त्यामुळे त्याची पत्नी धनश्री वर्मा आणि चहलच्या सासूबाईंनी आनंदाने ठुमके लगावले. याचा व्हिडिओ धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मल्हारी गाण्यावर धनश्री डान्स करताना दिसते आहे. मात्र ती डान्स करत असतानाच तिची आई धनश्रीला मागे सारून स्वतः डान्स करताना दिसत आहे.

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma And Her Mother Dance Gone Viral After 3rd T20I India vs South Africa
...झाला एकदाचा OUT, 4 मॅचनंतर साऊथ अफ्रिकेच्या फिनशरला बाद करण्यात यश

दरम्यान, भारतासाठी मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी तिसरा टी 20 सामना महत्वाचा होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी धडाकेबाज सुरूवात करत 95 धावांची सलामी दिली. ऋतुराजने 57 तर इशान किशनने 54 धावांची खेळी केली. यानंतर मात्र भारताच्या मधल्या फळीला फारशी चमक दाखवता आली नाही. अखेरच्या काही षटकात हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत 21 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली. यामुळे भारताने 20 षटकात 5 बाद 179 धावांपर्यंत मजल मारली.

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma And Her Mother Dance Gone Viral After 3rd T20I India vs South Africa
Eng Vs Nz: इंग्लंडच्या सलग दोन विजयामुळे WTC Points Table मध्ये मोठे बदल

भारताच्या 179 धावांच्या प्रत्युत्तरात खेळण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेला युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, अक्षर पटेल यांनी धक्के देण्यास सुरूवात केली. या धक्क्यातून सावण्याचा प्रयत्न रीजा हेंड्रिक्स (23) आणि हेनरिक क्लासनने (29) केला. मात्र चहल आणि पटेलच्या भेदक माऱ्यासमोर इतर आफ्रिकी फलंदाजांचा निभाव लागला नाही. अखेर दक्षिण आफ्रिकेचा डाव 131 धावात संपुष्टात आला. चहलने 3 पटेलने 4 तर अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारताने सामना 48 धावांनी जिंकला. आता पुढचा सामना 17 जूनला राजकोटमध्ये होणार आहे. आफ्रिका मालिकेत 2 - 1 अशी आघाडीवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com