जगातला सगळ्यात महागडा कंडोम माहितीये का ? लिलावात लागलीय मोठी रक्कम

हा 7 इंचाचा कंडोम स्पेनमधील एका शहरात बंद बॉक्समध्ये सापडला होता आणि तो अॅमस्टरडॅममधील एका व्यक्तीने विकत घेतला होता.
condom
condomgoogle

मुंबई : नसबंदी हा आजच्या जगाचा आविष्कार नाही. आपल्या पूर्वजांनी देखील त्यांचा वापर केला. आज कंडोम लेटेक्सपासून बनवले जातात. पूर्वी ते बनवण्यासाठी मेंढीच्या आतड्यांचा वापर केला जात असे.

१८-१९व्या शतकातील हा २०० वर्षं जुना कंडोम खूपच अनोखा आणि महागडा आहे. आज या लेखाद्वारे जगातील सर्वात महागड्या कंडोमच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ या. मेंढ्यांच्या आतड्यांपासून बनवलेला हा कंडोम ४२ हजार ५०० रुपयांना विकला गेला होता.

condom
स्तनच नाहीत तर चपलेचे मापही वाढते; प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात होतात हे बदल

गेल्या दोन वर्षांत कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिथे कंडोमची विक्री थोडी कमी होती. तिकडे कोविड-19 च्या काळात अनेक देशांमध्ये कंडोमची प्रचंड विक्री झाली. अनेक देशांमध्ये कंडोम नसल्यामुळे ते दुप्पट किंमतीत विकले जात होते.

पूर्वी मेंढ्या, डुक्कर, वासरे आणि बकऱ्यांच्या आतड्यांपासून बनवलेले कंडोम वापरले जात. त्यावेळी कंडोम फक्त श्रीमंत लोक वापरत होते, कारण ते खूप महाग विकले जात होते. तसेच, ते तयार करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागे.

19व्या शतकात जेव्हा रबर कंडोम बनवायला सुरुवात झाली तेव्हा त्यांची किंमत कमी झाली. यासोबतच प्रत्येक शतकात कंडोमचा विकास होत गेला. आज कंडोम सर्व आकारात आणि फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत. हा 7 इंचाचा कंडोम स्पेनमधील एका शहरात बंद बॉक्समध्ये सापडला होता आणि तो अॅमस्टरडॅममधील एका व्यक्तीने विकत घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com