डोळ्यावर विश्वास बसणार नाही इतकं भारी असेल तर लक्षात ठेवा.. हा स्कॅम आहे

खोटं वाटावं इतकं चांगलं असेल तर ते खरंच खोटं आहे
Flipkart shopping for gift Fraud scam believe eye
Flipkart shopping for gift Fraud scam believe eye sakal

सणासुदी लग्नावळी आणि बाकीचे मोठमोठाले उत्सव आले कि आपल्यापैकी अनेकजण बार्गेन मोडमध्ये जातो. आपला बराचसा वेळ प्रियजनांना,कुटुंबियांना गिफ्ट देण्यासाठी वेगवेगळे डील , डिस्काउंटेड आयटम्स शोधणे आणि त्याची शॉपिंग करण्यात व्यग्र होऊन जातो. हीच ती वेळ जेव्हा आपण मोहाला बळी पडतो. आपले उपजत ज्ञान,आपली नैसर्गिक अंतःप्रेरणा अगदी संपून गेलेली असते. खरं तर ऑनलाईन स्कॅम करणारे कलाकार नेहमीच तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात.पण शॉपिंगचा पीक पॉईंट असतो तेव्हा ते आपल्या छुप्या डिजिटल स्थानातून पॉप अप होऊ लागतात. जग हे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी आणि जबरदस्त सौदेबाजी विकायचा प्रयत्न करणाऱ्या फ्रॉड लोकांनी भरलेलं आहे,

या फसवणूक करणाऱ्यांकडे तुमच्या शॉपिंगच्या सवयी आणि खरेदी करण्याचे पॅटर्न ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. ते तुमच्या या सवयीचा वापर त्यांच्या फायद्यासाठी करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. हे ऑनलाईन स्कॅम आर्टिस्ट तुमच्या खिशातून पैसे काढण्यासाठी नेहमीच नवनव्या शकली लढवत असतात. आणि इकडे तुम्ही तुमचा शॉपिंगचा अनुभव आनंदी जावा,तुमच्या सेलेब्रेशनला धक्का बसू नये हि इच्छा असते. यासाठीच तुम्ही शॉपिंग मधले जाणकार असणे व तुम्हाला फाडायला बसलेल्या चोरांपासून सावध असणे महत्वाचे ठरते.

या लेखात आम्ही तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग स्कॅम ओळखण्याचे टिप्स काही देऊ. प्रत्येक घोटाळ्याची खास आणि विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. घोटाळेबाजांच्या जाळ्यात कसे पडू नये आणि तुमच्या पैशांचे संरक्षण कसे करावे हे आम्ही तुम्हाला सांगू.

कोणती काळजी घ्यावी?

येथे काही सर्वसाधारण डावपेचांची यादी आहे जी फसवणूक करणारे बेफिकीर ग्राहकांचे पैसे हडप करण्यासाठी वापरतात.

विश्वास : घोटाळेबाज त्यांची सुरवातच मुळात काही मार्गाने तुमचा विश्वास संपादन करून करतात. एकदा का हा विश्वास संपादन केला कि तुमचे पैसे व बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होतात. आपण सरकारमधून किंवा तुमच्या ऑफिसमधून किंवा फॅमिली मेम्बर असल्याचं ते भासवतात.

अनपेक्षित : जर तुम्हाला अचानक कोणतीही अपेक्षा नसताना या पूर्वी कोणताही संपर्क न झालेल्या अनोळखी ठिकाणाहून एसएमएस, ईमेल किंवा फोन कॉल आला तर सावधान ! तुमच्या फसवले जाण्याची ही सुरवात असेल. बऱ्याचदा हे एसएमएस आणि कॉल निष्पाप वाटतील.

आश्वासने : जेव्हा तुम्हाला खोटं वाटेल इतक्या भारी ऑफर किंवा आश्वासने मिळतात की त्या हमखास बनावट असतात. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी फ्री गिफ्ट मिळत असेल किंवा तुम्ही लकी ड्रॉचे विजेते असाल किंवा तुम्हाला फेमस आणि प्रीमियम ब्रँडचे कपडे,दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या लक्झरी वस्तू अविश्वसनीय कमी किमतीत मिळवण्यासाठी निवडले गेले असेल. या टेक्निकला फिशींग असं म्हणतात. तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवणे हे त्यांचे ध्येय असते.

भावनिक किंवा भय घटक : तुम्हाला कॉल,ईमेल किंवा एसएमएस किंवा तिन्ही येईल ज्यात तुमच्या Flipkartखात्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं सांगितलं जाईल. तुमचे खाते निलंबित केले जाणार आहे किंवा ते हॅक केले गेले आहे. तुम्ही ते दुरुस्त न केल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला लगेच लॉग इन करण्याची सूचना दिली जाईल. ही पद्धत तुम्हाला तुमची बँक किंवा इतर वैयक्तिक खाती उघडण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.

फेक वेबसाइट्स : फिशिंग मेल किंवा एसएमएस तुम्हाला बनावट फ्लिपकार्ट वेबसाइट्सवर घेऊन जातील. या बनावट साइट्समध्ये फॉर्म आहेत जे तुमचा पासवर्ड काढून घेतात,तुमचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरतात. आता आपण खरोखर हॅक झालेले आहात!

बर्‍याचदा हे घोटाळे तुम्हाला लिंकवर क्लिक करण्यास किंवा खात्यात लॉग इन करण्यास सांगतात. ते धोकादायक असू शकते कारण ते वैध पोर्टल नाही आणि तुम्ही तुमची माहिती शेअर करता जी तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी वापरली जाईल.

मग आम्ही काय करावं?

  • ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज मध्ये सांगितल्या प्रमाणे कधीही करू नका..

  • क्लिक करणे टाळा.

  • वैयक्तिक माहिती देणे टाळा

  • या नंबरवर कॉल बॅक करणे टाळा

  • हे मेसेज फॉरवर्ड करणे देखील टाळा

  • दबावात किंवा भीतीमध्ये ऍक्शन घेणे टाळा. शंकास्पद ईमेल,एसएमएस किंवा कॉल लगेच बंद करून टाका. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी धमकी किंवा दाव्याची सत्यता पडताळा.

  • विक्रेत्याचे प्रोफाइल,त्यावरील रिव्हीव्यू आणि अभिप्राय पहा.

  • चुकीचे स्पेलिंग,व्याकरणातील चुका आहेत का तपासा. अधिकृत संस्था अशा तपशीलाकडे खूप लक्ष देतात.

फसवणूक करणारे त्यांची शिकार शोधण्यासाठी वर्षभर न थकता काम करत असतात. निष्ठुरपणे तुमचा पैसा काढून घेणे हे त्यांचे अटळ मिशन आहे. त्यांच्याशी लढण्याचं सर्वात सोपं शस्त्र म्हणजे फसवणुकीचा प्रतिकार करणे आणि आपल्याला आलेल्या अशा अनुभवाची लगेच तक्रार करणे.

म्हणूनच सुरक्षितपणे शॉपिंग करा आणि फसवणुकीविरोधात फ्लिपकार्टने सुरू केलेल्या मोहीमेत सामील व्हा. #FightFraudWithFlipkart.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com