गौर गोपाल दास सांगतात नातेसंबंधात Love Language महत्वाची!

कपल्सचा एकमेकांवर असलेला दृढविश्वास ही देखील एक प्रेमाची भाषा असल्याचे गौर गोपाल दास सांगतात
tips from Gaur Gopal Das For Relationship
tips from Gaur Gopal Das For Relationshipgoogle
Summary

गौर गोपाल दास हे गॅरी चॅपम्रन (Gary Chapman ) यांच्या 'The 5 Love Languages' या पुस्तकाचा संदर्भ देतात. त्या पुस्तकाप्रमाणे प्रेमाच्या पाच भाष्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला या पाच भाषांची कमी अधिक प्रमाणात गरज असते.

व्हेलेंटाईन डे साठी अवघे दोन दिवस उरले आहेत. तिला किंवा त्याला प्रपोज करताना ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर साथ देऊ शकते का हे तुम्ही पाहिलेच असेल. पण तुमचं नातं (Relationship) ग्रेसफुली जागायचं असेल तर नात्यात विश्वास महत्वाचा असतो. हा विश्वास तुम्ही एकमेकांना कशाप्रकारे देऊ शकता याचा विचार करणे गरजेचे असते. लाइफस्टाइल कोच, मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी नात्यात तुम्ही कशाप्रकारे एकमेकांना विश्वास देऊ शकता ते सांगितले आहे. तसेच Love Language चे महत्वही सांगितले आहे.

tips from Gaur Gopal Das For Relationship
पुरूषांमध्ये ब्रेकअपनंतर वाढतायत मानसिक समस्या, अभ्यासात स्पष्ट
couple
coupleesakal

यासंदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. ते म्हणतात की, प्रत्येक नातं हे परस्पर विश्वासाच्या पायावर उभं असतं. विश्वास ही देखील प्रेमाची एक भाषा आहे. (Love Language) जर तुम्ही एकमेकांना विश्वास देऊ शकला नाहीत, जोडीदाराला अपेक्षित असणारे वागू शकला नाहीत, तर तुमचे जोडीदारावर प्रेम नाही असं त्याला वाटू शकतं. पुढे ते म्हणतात की, तुम्ही तुमच्या भावना आणि विचार कशाप्रकारे मांडता यालाही महत्व आहे. जर दोघं काय बोलताय ती भाषाच नीट समजत नसेल, तर तुमच्यात गहन संवादच होणार नाही. तुमचे विचार, तुमच्या भावना एकमेकांपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे प्रेमाची भाषा कळणे गरजेचे आहे. प्रत्येकाची ही प्रेमाची भाषा वेगवेगळी असू शकते, असेही ते सांगतात. यासाठी गौर गोपाल दास हे गॅरी चॅपम्रन (Gary Chapman ) यांच्या 'The 5 Love Languages' या पुस्तकाचा संदर्भ देतात. त्या पुस्तकाप्रमाणे प्रेमाच्या पाच भाष्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला या पाच भाषांची कमी अधिक प्रमाणात गरज असते.

tips from Gaur Gopal Das For Relationship
व्यायामामुळे सुधारते लैंगिक आरोग्य, अभ्यासात स्पष्ट
Couples
Couplesesakal
tips from Gaur Gopal Das For Relationship
मुलांनो, गर्लफ्रेंडला कोणत्या प्रकारचं चॉकलेट आवडतं यावरून ओळखा तिचा स्वभाव!

पाच प्रेमाच्या भाषा (The 5 Love Languages)

गौर गोपाल दास यांनी एकमेकांवरच्या विश्वासासाठी प्रेमाच्या या पाच भाष्या महत्वाच्या असल्याचे सांगितले आहे.

१) कौतुकाचे शब्द (words of affirmation)- मनातल्या गोष्टी बोलून दाखवणं. तसेच तुमचे एकमेकांवरचे प्रेम, कौतुकाचे शब्द, शाबासकी हे दुसऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करतात. ज्यांची प्रेमाची भाषा ही कौतुक करणारी असते ते सहसा संवेदनशील असतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जागरूक असतात. दुसऱ्यांना ते कायम प्रोत्साहन देतात. तसेच इतरांना बरे वाटण्यासाठी काय बोलावे हे त्यांना माहिती असते.

२) सेवाभावी कृती ( acts of service) - तुमच्या जोडीदाराला हवी असलेली किंवा गरजेची अपेक्षा असलेल्या गोष्टी आपणहूनच केल्याने तुम्ही त्यांची किती काळजी घेत आहात हे दिसून येते. तिच्यासाठी जेवण बनवणे, न विचारता एखादे काम करणे, जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे अशा काही छोट्या- मोठ्या गोष्टींतून एकमेकांची काळजी आणि सेवाभावी वृत्ती दिसते.

tips from Gaur Gopal Das For Relationship
फक्त 20 सेकंद मिठी मारा, शरीरात होणाऱ्या पाच बदलांचा अनुभव घ्या!
touch
touch

३) भेटवस्तू देणे (gift) - छोट्या-मोठ्या भेटवस्तू देऊन तुम्ही जोडीदाराला आनंद देऊ शकता. असं गिफ्ट देण्यासाठी खूप पैसे मोजणे गरजेचे नाही. पण तिला- त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे सरप्राईज गिफ्ट देऊनही तुम्ही त्यांच्या मनात तुमच्याविषयी आणखी आपुलकी, प्रेम निर्माण करू शकता.

४) सहवास ( quality time) - नातेसंबंध विकसित होण्यासाठी प्रत्येक जोडप्याला सहवास हवा असतो. तुम्ही तुमचा वेळ एकमेकांना देऊन प्रेम व्यक्त केल्याने तुमचे नाते आणखी विकसित होऊ शकते. मात्र हे करताना तुम्ही जोडीदारासोबत असताना, तुमचा फोन बंद करून फक्त त्यांना वेळ द्या. या कृतूतून तुम्ही त्यांच्यासाठी जास्त महत्वाचे आहात हे कळेल. एकमेकांच्या सहवासाने नाते अधिक बहरते. चांगला संवाद घडतो. त्या संवादातून एकमेकांची अधिक चांगली ओळख होते.

५) शारीरिक स्पर्श (physical touch) - पाच भाषांपैकी एक महत्वाची भाषा म्हणजे शारीरिक स्पर्श. प्रेमात एकमेकांचा स्पर्श हा खूप महत्वाचा असतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो, चुंबन घेणे, मिठी मारणे, हात पकडणे आणि सेक्स हे सर्व शारीरिक स्पर्श प्रेम भाषेद्वारे व्यक्त करता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com