रामदास स्वामींवरील वादग्रस्त पुस्तक मागे

Ramdas Swami
Ramdas Swami

मुंबई : एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत शाळांना पुरविण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर असल्याने संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने वादग्रस्त पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी वितरित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शाळांमध्ये वितरित करण्यात आलेली पुस्तके मुख्याध्यापकांनी ताब्यात घेण्याचे आदेशही परिषदेने दिले आहेत. 

मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर ज्ञान मिळावे यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्यावतीने विविध विषयांवर पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. समर्थ श्री रामदास स्वामी यांच्यावरील पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण आढळल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण झाला. यावरून विविध संघटनांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली. नागपूर येथील लाखे प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. हे पुस्तक तातडीने मागे घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागल्यानंतर अखेर परिषदेने संबंधित पुस्तक मागे घेतले. 

चौकशीसाठी इतिहास समिती 
विद्यार्थ्यांना हे वादग्रस्त पुस्तक वाचण्यास देऊ नये. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडे असलेली पुस्तके शाळांनी ताब्यात घेऊन मुख्याध्यापकांकडे ठेवावीत, असे आदेश परिषदेने दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इतिहासकारांची एक समिती नेमण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर योग्य ते पाऊल उचलण्यात येणार असल्याचे परिषदेने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com