तेरा ऑक्‍टोबर रोजी दलित मराठा ऐक्‍य परिषद - रामदास आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई - रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या 13 ऑक्‍टोबर रोजी शिर्डी येथे दलित मराठा ऐक्‍य परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

मराठा समाजामध्ये त्यांच्या हक्कांसाठी जागृती निर्माण होत आहे. त्यातून लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात क्रांती मोर्चे निघत आहेत. या मोर्चांचे रिपाइंने स्वागत केले आहे. राज्यात दलित मराठा यांच्यात बंधुत्व आणि दोन्ही समाजात सलोखा वाढीस लागावा, यासाठी ही दलित मराठा ऐक्‍य परिषद महत्त्वाची ठरणार आहे. या परिषदेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीचा ठराव संमत करण्यात येणार आहे. 

या दलित मराठा ऐक्‍य परिषदेस विविध पक्षांतील मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यापूर्वी 7 ऑक्‍टोबरलाही ऐक्‍य परिषद होणार होती. मात्र, आता त्यात बदल करून 13 ऑक्‍टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे.