'महावितरण'ची वीज महागली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

घरगुती ग्राहकांसाठी युनिटमागे सव्वा टक्के वाढ
मुंबई - सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणारी वीजदरवाढ "महावितरण'ने अखेर लागू केली आहे. सर्वसामान्य घरगुती ग्राहकांच्या खिशाला या दरवाढीमुळे कात्री लागेल. युनिटमागे सव्वा टक्के वाढीमुळे घरगुती ग्राहकांना नोव्हेंबरपासूनचे बिल वाढीव रकमेचे येईल.

आता 1 ते 500 युनिटपर्यंत युनिटमागे सव्वा टक्के वाढ होत आहे. दारिद्य्ररेषेखालील ग्राहकांसहित सर्व घरगुती ग्राहकांसाठी विजेच्या सरासरी आकारणी दरात 1 ते 1.3 टक्के वाढ करण्यात आली आहे. कृषी ग्राहकांच्या वीजदरातही यंदा वाढ करण्यात आली आहे.

"महावितरण'ने कृषिपंपासाठीच्या वीज विक्रीचे अंदाज जास्त मांडल्याचे लक्षात आल्यानेच यंदा प्रथमच आयोगाने ते स्वीकारले नाहीत. त्यामुळेच कृषिपंपाच्या वीज विक्रीच्या आधारावर विजेच्या गळतीची लपवाछपवी उघड झाली आहे. "महावितरण'ने 2014-15 आणि 2015-16साठी अनुक्रमे 14.17 आणि 14.51 टक्के गळती दाखवली होती; पण आयोगाने ही गळती 16.36 आणि 18.24 टक्के अशी अनुक्रमे दोन वर्षांसाठी निश्‍चित केली आहे.

नवीन खरेदी करार स्थगित करा
"महावितरण'चा वीज खरेदीवर होणारा खर्च आणि यंत्रणेत शिल्लक असणारी वीज याबाबतही आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. शिल्लक वीज कोणत्या प्रकारे विकल्यास जास्त किफायतशीर ठरेल ते तपासावे, असे आयोगाचे म्हणणे आहे. प्राथमिक स्थितीतील वीजनिर्मिती संचांबाबतचे वीज खरेदी करार स्थगित ठेवा. या करारांचा आढावा घ्या, असेही आयोगाने सुचवले आहे. "महावितरण'च्या यंत्रणेत 25 हजार दशलक्ष युनिट इतकी वीज यंदा शिल्लक असेल. 2019-20 अखेर 42 हजार दशलक्ष युनिट इतकी लक्षणीय वाढ शिल्लक विजेत होईल.

"आरपीओ'ची पूर्तता न केल्यास दंड
महावितरणचे नूतनशील ऊर्जा खरेदी बंधन (आरपीओ) पाळताना 2013-14पर्यंतची तूट भरून काढण्यासाठी कंपनीला 2015-16पर्यंत मुदत देण्यात आली होती; पण "आरपीओ'ची पूर्तता न केल्याबद्दल कंपनीच्या महसुली तुटीतून ही रक्कम आयोगाने कमी केली आहे.

अशी आहे नवीन वीजदरवाढ (नोव्हेंबर 2016 पासून)
वीजवापर - सध्याचे दर - नवीन दर

0-100 - 4.13 - 4.16
101-300 - 7.88 - 7.91

Web Title: mahavitaran electricity rate expensive

टॅग्स