महिलांचा बोलबाला ११७ नगरपालिकांत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

मुंबई - राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील नगरपालिकांचे नगराध्यक्ष यापुढे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या १८ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची व २३३ नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते आज मंत्रालयात काढण्यात आली. यापैकी ११७ नगरपालिकांत महिलांकडे अध्यक्षपदाची सूत्रे असतील.

दरम्यान, नगराध्याक्षाला थेट निवडून द्यावयाचे असल्याने नगरविकास विभागाच्या विद्यमान कायद्यात बदल करण्यात आला आहे. कायद्यातील नवीन तरतुदीनुसार नगराध्यक्षाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल, पूर्वी अडीच वर्षांचा होता. नगराध्यक्षाला वित्तीय; तसेच अन्य अधिकार देण्यात येणार आहेत. कमीत कमी दोन वर्षे नगराध्यक्षाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. नगराध्यक्षाने मुदतपूर्व स्वतः राजीनामा दिल्यास 
आमदार-खासदारांच्या धर्तीवर पोटनिवडणुकीने पुन्हा निवड करण्यात येणार आहे. नवीन १८ नगरपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी २, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ६, तर खुला प्रवर्गासाठी ५ पदांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले; तर नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी काढलेल्या सोडतीत २३३ नगर परिषदांपैकी अनुसूचित जातीसाठी ३१, अनुसूचित जमातीसाठी १०, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ६३, तर खुला प्रवर्गासाठी १२९ पदांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले.

महाराष्ट्र

मुंबई : मुंबईसह राज्यातील इंटीग्रेडेट कॉलेजचा गोरखधंदा जून 2018 पासून कायमचा बंद करण्यात येईल आणि शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यात...

04.45 PM

  मुंबई : विधानसभेत आज (शुक्रवार) वंदे मातरम् गीत गाण्यावरून गदारोळ झाला. सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार प्रचंड...

02.15 PM

मुंबई - राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला. कर्जाची 2016...

06.06 AM