नूतन मंत्र्यांना बंगले वाटप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

जानकरांना ‘वर्षा‘नजीकचा ‘मुक्तागिरी‘

जानकरांना ‘वर्षा‘नजीकचा ‘मुक्तागिरी‘
मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळालेल्या नूतन मंत्र्यांना बंगल्याचे वाटप झाले असून, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते पशू, दुग्धविकास आणि मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांना मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा‘ निवासानजीकचा "मुक्तागिरी‘ हा बंगला मिळाला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनादेखील मलबार हिल येथील बंगले मिळाले आहेत. कॅबिनेटमंत्री सुभाष देशमुख यांनी मंत्रालयाशेजारील "सुरूची‘ या इमारतीतील सदनिकेला पसंती दिली आहे. इतर मंत्र्यांना वाटप झालेले बंगले पुढीलप्रमाणे - पांडुरंग फुंडकर- रॉकी हिल, इमारत क्र.1, प्रा. राम शिंदे- पुरातन, पहिला मजला, मलबार हिल, जयकुमार रवाल - रॉकी हिल, सदनिका-2, संभाजी निलंगेकर- रॉकी हिल- सदनिका 3, अर्जुन खोतकर- रॉकी हिल टॉवर, मदन येरावर- अंबर, मलबार हिल, गुलाबराव पाटील- रॉकी हिल टॉवर, सदनिका-1202, रवींद्र चव्हाण- मंत्रालयाशेजारील क.2, तर सदाभाऊ खोत यांना क-6 हा बंगला मिळाला आहे.