महाराष्ट्र टॅक्‍सी योजनेला दीडशे हरकती, सूचना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

मुंबई - ओला-उबेर या मोबाईल ऍपवर आधारित खासगी टॅक्‍सींना नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी परिवहन विभागाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र टॅक्‍सी योजनेवर हरकती व सूचनांचा पाऊस पडला आहे. सुमारे दीडशे हरकती व सूचना आल्या आहेत.

मुंबई - ओला-उबेर या मोबाईल ऍपवर आधारित खासगी टॅक्‍सींना नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी परिवहन विभागाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र टॅक्‍सी योजनेवर हरकती व सूचनांचा पाऊस पडला आहे. सुमारे दीडशे हरकती व सूचना आल्या आहेत.

उबेर कंपनीने दरनिश्‍चिती; तर ओलाने परमिटसाठी अवाजवी रकमेला आक्षेप घेतला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत वैयक्तिक स्तरावर 125 ते 150 हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. ते वगळता रिक्षा-टॅक्‍सी युनियन, ओला-उबेर कंपन्यांच्या छापील अर्जावर चालकांनी सह्या करून पाठवलेल्या हरकतींचा आकडा चार ते पाच हजार असल्याचे परिवहन खात्यातून सांगण्यात आले. त्यात पुनरावत्ती असल्यास मोजकेच व हरकतीयोग्य मुद्दे विचारात घेण्यात येणार आहेत.

नियम धाब्यावर बसवत टुरिस्ट परमिटवर ओला व उबेर कंपनीने कोट्यवधींचा व्यवसाय केला. आता राज्य सरकारच्या परिवहन खात्याने "महाराष्ट्र टॅक्‍सी योजना-2016' चा मसुदा प्रसिद्ध करत इच्छुकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. परमिटसाठी दोन लाख 61 हजार रुपये अवाजवी असल्याचा मुद्दा ओला व उबेर कंपन्यांनी हरकतीत मांडला आहे.

1400 सीसीपेक्षा अधिक क्षमता असलेल्या वाहनांसाठी परमिटची रक्कम दोन लाख 61 हजार आहे. गाडी खरेदी करताना या रकमेचा कुणीच विचार केला नव्हता. त्याचा जवळपास 30 टक्के आर्थिक भार वाढेल. याचा थेट परिणाम ग्राहकांपर्यंत जाईल. दर ठरवण्याबाबत आमचा कुठलाही आक्षेप नाही.
- जॉय बांदेकर, कॉर्पोरेट प्रेसिडेंट, ओला कंपनी

ऍपवर आधारित टॅक्‍सीसाठी कमीत कमी व जास्तीत जास्त दर ठेवण्यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. स्वतंत्र समिती दरनिश्‍चिती करते. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य केलेले नाही. याशिवाय परमिटसाठी अवाजवी रकमेचा आम्ही उल्लेख केला आहे. रंग, चालकांना बॅज आदींबाबत आम्ही मत नोंदवले आहे.
- शैलेश सावलानी,व्यवस्थापक, उबेर, मुंबई

Web Title: objections Maharashtra taxi scheme, the notification