प्रशांतच्या तोंडून चुकीचे शब्द गेले - सुधाकर परिचारक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पंढरपूर - 'जिल्हा परिषद निवडणूक प्रचारामध्ये प्रशांतच्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले. त्याच्याकडून असे व्हायला नको होते; परंतु त्याने जाहीर माफी मागितली आहे, तरीही विरोधकांकडून राजकारण सुरू आहे,'' अशी खंत आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते व ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांनी व्यक्त केली. तसेच, कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जशी साथ दिली, तशीच साथ आताही द्यावी, असे आवाहन केले.

पंढरपूर बाजार समितीच्या कार्यक्रमात सुधाकर परिचारक बोलत होते. कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. सध्या पांडुरंग परिवाराला वाईट काळ आला असल्याचे सांगताना त्यांना गहिवरून आले. ते म्हणाले, 'यापूर्वी पांडुरंग परिवारावर अनेक राजकीय संकटे आली. त्या त्या वेळी कार्यकर्ते न डगमगता खंबीरपणे परिवाराच्या मागे उभे राहिले. मध्यंतरी निवडणूक प्रचारामध्ये प्रशांतच्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले, त्याच्याकडून असे व्हायला नको होते. परंतु, त्याने जाहीर माफी मागितली आहे, तरीही विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी शांतता राखावी.'' प्रशांत परिचारकांनी सैनिकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुधाकर परिचारक यांनी आज प्रथमच आपली भावना कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केली.

Web Title: prashant was the wrong word