लाचार होऊन कोणाजवळ जाणार नाही - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही लाचार होऊन कोणाजवळ जाणार नसल्याचे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता होणार आहे. या विस्तारात साधारणतः 10 ते 15 नवे मंत्री होऊ शकतात. नव्या मंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशाचा वरचष्माा राहणार असून महाराष्ट्रातून रामदास आठवले व विनय सहस्त्रबुध्दे यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा या विस्तारात समावेश नाही. 

याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या कामात मी व्यस्त आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माझी याबाबत कोणाशी चर्चाही झाली नाही. आम्हाला काय पाहिजे काय नाही हा प्रश्नच नाही. आम्हाला जे काही मिळावे ते सन्मानाने मिळाले पाहिजे. लाचार होऊन आम्ही कोणाकडे जाणार नाही.