राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय नोकरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

मुंबई - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 

मुंबई - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 

राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे, यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे विशेष धोरण आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा केली. त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे.

या खेळाडूंमध्ये संदीप यादव (क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), कविता राऊत (आदिवासी विकास विभाग), ओंकार ओतारी (तहसीलदार, महसूल विभाग), अजिंक्‍य दुधारे (क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), पूजा घाटकर (विक्रीकर निरीक्षक, विक्रीकर विभाग), नितीन मदने (तहसीलदार, महसूल विभाग), किशोरी शिंदे (नगरविकास विभाग) आणि नितू इंगोले (क्रीडा विभाग) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र

पुणे - अर्धा पावसाळा झाल्यानंतरही निम्मा कोरडा राहिलेल्या महाराष्ट्रात रविवारपासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली....

05.18 AM

धुळे - सुरवातीला संवाद माध्यमातील क्रांती वाटणारा मोबाईल कधी ‘फोर जी’वर गेला अन्‌ मुले त्याच्या आहारी गेली, हे आता...

04.51 AM

कोल्हापूर - ‘‘भारतीय जनता पक्षाला राज्यात बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे. पुन्हा सत्तेवर येऊ का नाही हे त्यांना माहीत...

04.45 AM