विधान परिषदेचे चित्र आज स्पष्ट होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

सहा जागांसाठी 54 अर्ज वैध; अपक्षांचा सर्वाधिक भरणा
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांच्या निवडणुकीचे चित्र उद्या (शनिवार) स्पष्ट होईल. पाच नोव्हेंबरला अर्ज माघारीची मुदत संपत आहे. या मुदतीत कॉंग्रेस आघाडीत समझोता होणार की नाही, याकडे दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर एकूण 54 अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवारांचा भरणा अधिक आहे. एकट्या जळगावमध्ये 24 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अर्ज माघारीच्या वेळी अनेक अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

विधान परिषदेच्या पुणे, सांगली-सातारा, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, जळगाव आणि नांदेड या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही कॉंग्रेस आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव झाला आहे. कॉंग्रेसने निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच ठिकाणी अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नांदेड आणि यवतमाळ वगळता इतर चार मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यवतमाळमध्ये विद्यमान आमदार संदीप बाजोरिया हे अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत, तर नांदेडमध्ये राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार श्‍यामसुंदर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या अशोक येनपुरे आणि शिवसेनेच्या ज्ञानेश्‍वर खंडागळे असे दोघांचे अर्ज आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

महाराष्ट्र

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. राज्यात कर्जमुक्तीची...

05.33 AM

मुंबई - कोकण परिसरात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पक्षात घेतले जाणार हे निश्‍चित आहे...

04.45 AM

मुंबई - स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात 418 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार हादरले आहे. मात्र त्यातील जवळपास 60 टक्के...

03.45 AM