आता मार्ग अंमलबजावणीचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - तनिष्का, ियन तसेच महान राष्ट्र नेटवर्क आदींमधून समोर आलेल्या राज्यातील जनतेच्या सूचना उच्चस्तरीय अशा मुख्यमंत्री परिषदेसमोर (चीफ मिनिस्टर्स ट्रान्स्फॉर्मेशन कौन्सिल) ठेवल्या जातील. तेथे याबाबतचे तोडगे वा पुढील अभ्यास याबाबत चर्चा होऊन अंमलबजावणीचा मार्ग आखला जाईल, अशी माहिती डीसीएफ अॅडव्हायझरीचे संचालक बॉबी निंबाळकर यांनी डीसीएफच्या दोन दिवसीय परिसंवादाचा समारोप करताना दिली.

डीसीएफने आतापर्यंत केलेले काम, तसेच दोन दिवसांच्या परिसंवादानंतर डीसीएफच्या पुढील वाटचालीबाबतची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. राज्यातील जनतेला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्यांची माहिती डीसीएफकडे आली आहे. आता पुढील टप्प्यात शिक्षण, आरोग्य, आयटी, नगरविकास, गृहनिर्माण, पर्यटन, कौशल्यविकास, उद्योग, कृषी व पाणी या विभागांच्या उच्चस्तरीय परिषदेत बैठका होतील. वर्षभरात प्रत्येक विभागाच्या नऊ बैठका होतील. या बैठकांना सरकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्री परिषदेचे सदस्य हजर राहतील.

बैठकांच्या तारखा व त्यातील चर्चेचे मुद्दे सदस्यांना आधीच कळविले जातील. त्यात विविध प्रश्नांवरील उपाययोजना वा पुढील संशोधन; तसेच अंमलबजावणीचा मार्ग याबाबत चर्चा होईल, असेही निंबाळकर म्हणाले.

Web Title: way of implementation